उस्मान रोहेकरांनी शिंदे गटाचा दिला राजीनामा ;घर वापसी करणार की, दुसर्‍या पक्षात जाणार? रोह्यात चर्चा

By Raigad Times    29-Apr-2024
Total Views |
 roha
 
रोहा | शिवसेना (शिंदे गट) रोहा तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष उस्मान रोहेकर यांनी आपल्याापदाचा तडकाफडकी राजीनामा
दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. वेळ आल्यावर धमाका करू असेही रोहेकर यांनी म्हटले आहे.
 
शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख समीर शेडगे यांचे खास असलेले भाई रोहेकर हे राजकीय उलथापालथीमध्ये शिंदे गटात गेले होते. मात्र आता लोकसभा निवडणूकीत रोहेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर, ते आता कुठल्या पक्षात जातात? याकडे लक्ष आहे.दरम्यान, उस्मान रोहेकर आणि सुनील तटकरे यांचे फारसे जमल्याचे दिसले नाही. अशात शिंदे गट लोकसभेसाठी तटकरेंचे काम करत असल्याने त्यांची घुसमट होत होती. त्यामुळे त्यांनी राजीनामादिल्याची चर्चा आहे.