अलिबाग गोंधळपाडा येथील मजूर महिलेची हत्या

By Raigad Times    27-Apr-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबाग तालुयातील गोंधळपाडा येथील एका महिलेची हत्या केल्याची घटना घडली. मजुरीचे राहिलेले पैसे मागितल्यामुळे ठेकेदाराने ही हत्या केल्याची तक्रार तिच्या मुलाने पोलीसात दिली आहे.कमलीबाई किसन पवार (५०) असे या मृत महिलेचे नाव आहे. किहीम येथील मयेकर यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. त्याठिकाणी ही महिला काम करीत होती.
 
केलेल्या कामाची मजूरी मिळावी यासाठी ती गुरुवारी (दि. २५) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ठेकेदार मल्लीकार्जुन याला भेटली.
यापूर्वी त्यांचे पैसेे देणे, घेण्यावरून वाद झाला होता अशी माहिती तिच्या मुलाने दिली. मल्लीकार्जुन याने रागाच्या भरात हत्याराने तिच्या डोयात वार केला. त्यामध्ये ती बेशुद्ध झाली.
 
तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉटरांनी तिला अगोदरच मृत असल्याचे घोषित केले.
याप्रकरणी व्यंकटेश किसन पवार यांनी मल्लिकार्जुन यांच्याविरोधात तक्रार देत त्यानेच कमलाबाईचा खून केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदविली आहे