देशाला जिवंत ठेवायचे काम मोदींनी केले! कोेविड लसीसाठी तरी मोदींना मत दिलेच पाहिजे - देवेंद्र फडणवीस

By Raigad Times    27-Apr-2024
Total Views |
 pen
 
पेण | ही निवडणूक साधी नाही, देशाची निवडणूक आहे. हा देश कुणाच्या हाती द्यायचा, याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. मोदीजींमुळे प्रचंड काम झाले आहेच; परंतू कोविड काळात देशाला जिवंत ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे कोविड लसीसाठी तरी मोंंदींना मतदान झाले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 
रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचारसभेचे आयोजन २६ एप्रिल रोजी पेण येथे करण्यात आले होते. यावेळी बोलताना, फडणवीस यांनी महाआघाडीवर शरसंधान साधले. एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधींची २६ पक्षांची खिचडी आहे.
 
आपली महायुती विकासाची गाडी आहे नरेंद्र मोदी साहेब इंजिनआहेत तर दुसरीकडे प्रत्येकजण इंजिन आसल्याचे सांगत आहे. राहुल गांधी त्यांचे इंजिन दिल्लीकडे ओढतात, शरद पवार त्यांचे इंजिन बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे त्यांचे इंजिन मुंबईकडे ओढतात असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
 
pen
 
नरेंद्र मोदी यांनीच खर्‍या अर्थाने देेशाचा विकास केला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये देशातले २५ कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर आले आहेत. २० कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना हक्काचे घर मिळाले आहे. देशामध्ये ५० कोटी घरांमध्ये मोदीजींनी गॅस पोचवला. ५५ कोटी लोकांना मोदीजींनी त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करून दिली. ६० कोटी लोकांच्या घरी पिण्याचे पाणी पोहचवले असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
 
यासोबतच ५५ कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज हा आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोफत दिला. सात कोटी तरुणांना मुद्राचे लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं दिले असून, ३१ कोटी महिला मोदीजींमुळे आपल्या पायावर उभा राहिल्या आहेत. मोदीजींनी जवळपास ८० लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि महिलांना आपल्या पायाभूत केले.
 
आता तर मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणली आहे एक कोटी लोकांनी ऑलरेडी एप्लीकेशन केली आहे. मोदीजीका पिछले दस साल तो ट्रेलर था असली पिचर अभी बाकी है असे सांगतानाच, पुढची पाच वर्षे पुन्हा एकदा मोदीजीच आपल्या देशाला जगात तिसर्‍या क्रमांकावर आणतील.
 
pen
 
१४० कोटींचा भारत आहे, कोरोनाच्या काळात किमान ४०-५० कोटी लोकांना वाचवू शकणार नाही अशी भिती व्यक्त होत होती. जगाच्या पाठीवर तीन-चार देश होते, ज्यांनी कोविडची लस तयार केली होती. पण आपल्या पंतप्रधानांनी आपल्याच देशात कोविडवरची लस बनवून घेतली. ही लस १४० कोटी लोकांना दिली म्हणून आपण आज जिवंत आहोत. एक पैसा न घेता प्रत्येकापर्यंत लस पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केले.
 
म्हणून म्हणतो, बाकी मोठी कामे सोडा, यावेळेस मोदीजींना फक्त कोविड लसीमुळे देखील आपण मत दिले पाहिजे, कारण या देशाला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.यावेळी चारशेचा आकडा पार होणार होणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. रायगडचा विकास होतोय, अनंत गीते तुम्ही निवडणुका लढवल्यात तेव्हा भाजप तुमच्या सोबत होती. अनंत गिते तुम्ही रायगडसाठी काय केलेत? असा प्रश्न सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला.
 
नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे, यासाठी सुनिल तटकरेंना निवडून द्यायचे आहे. पेणमधून ५० हजार मतांची आघाडी सुनिल तटकरेंना मिळवून देणार असल्याचे ग्वाही आमदार रविंद्र पाटील यांनी दिली.यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकुर, आमदार महेश बालदी, आमदार प्रविण दरेकर, आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यक्षिल पाटील, सरचिटणिस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजपचे पेण विधानसभेचे प्रमुख प्रसाद भोईर आदिसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.