वंचित आघाडीच्या उमेदवार , माधवी जोशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

27 Apr 2024 16:09:42
 pali
 
पाली/बेणसे | मावळ लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून त्यांनी शक्तिप्रदर्शन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा निरीक्षक प्रियदर्शी तेलंग, रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, जिल्हा महासचिव वैभव केदारी, जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शारदा ताई बनसोडे, रामदास भगत, पँथर सुशील भाई जाधव यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली.
 
यावेळी रॅलीचे रूपांतर भव्य प्रचार सभेत झाले. यावेळी माधवी ताई यांनी, माझ्यावर बाळासाहेब आंबेडकर आणि जनतेने जो विश्वास दाखवला, तो विश्वास मी सार्थ ठरवेन अशी ग्वाही दिली. जनतेने संधी दिल्यास, जनतेचा पाठिंबा असल्याने वंचित बहुजन आघाडीचा खासदार लोकसभेत जिंकून जाईल, आणि सर्वसामान्य, गोरगरीब , कष्टकरी श्रमजीवी वर्गाचा आवाज बुलंद करेल असा विश्वास यावेळी माधवी जोशी यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0