माणगाव येथे महिलेची पतीविरोधात बलात्काराची तक्रार

By Raigad Times    26-Apr-2024
Total Views |
 mangoan
 
माणगाव | माणगाव येथील एक महिलेने तिच्या पती विरोधात बलात्कार केल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे.
 
चार वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. तेव्हा पासून दोघेही एकाच घरात राहत आहेत. मात्र सदर महिलेने तिच्या पती विरोधात बलात्कार, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची तक्रार नोंदवली आहे. पतीकडून मनाविरोधात जबरदस्तीने, वारंवार शारीरिक संबंध केले गेल्याची तक्रार दिली आहे.
  
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत