सावत्र बाप निघाला हैवान;अल्पवयीन मुलीवर बलात्कार , खारघर पोलिसात गुन्हा दाखल, नराधम बापाला बेड्या

By Raigad Times    26-Apr-2024
Total Views |
 panvel
 
पनवेल | बाप निघाला हैवान, अल्पवयीन सावत्र मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना खारघर येथे घडली. वकिल असलेल्या या नराधमाची काळेकृत्ये मुलीच्या शिक्षिकेने समोर आणली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
 
४२ वर्षीय हा नराधम व्यावसायाने वकील असून तो खारघर येथील सेटर १९ आणि कामोठे येथील सेटर १८ मधील एका सोसायटीत राहत असताना, त्याने सावत्र अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. मुलीची आई घराबाहेर गेल्यावर तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे.
 
गेली चार वर्ष त्याचा ती मुलगी अन्याय सहन करत होती. अखरे त्या मुलीने आपल्या शिक्षिकेला झालेला प्रकार सांगितला.शिक्षिकेने हे प्रकरण बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आणून दिले. समितीच्या विधि सल्ल्यानंतर हे प्रकरण खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले.खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी याप्रकरणी बापाला अटक केली आहेत.