‘महाराष्ट्राचे वैभव परत मिळवून देऊ’,शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा

By Raigad Times    26-Apr-2024
Total Views |
 MUMBAI
 
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा गुरुवारी जाहीर करण्यात आला. या वचननाम्यात महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ असे वचन देण्यात शिवसेनेने दिले आहे. तसेच तरुणांना रोजगार, इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर लूट थांबवू, शेतकर्‍यांना कर्जमुक्त करणार, जिल्हा रुग्णालयं अद्ययावत करणार अशी आश्वासनं देण्यात आली आहेत.
 
भाजपला पराभव दिसायला लागल्यामुळे ते आता राम राम म्हणायला लागले आहेत. हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे. आम्ही भाजपसोबत होतो, पण आता त्यांच्या मनातील पाशवी इच्छा देशासमोर आली आहे. त्यांना आता पाशवी बहुमत पाहिजे, त्यांना देशाची घटना बदलायची आहे. त्यांची स्वप्न आता उघड झाली आहेत असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
 
शिवसेनेच्या वचननामातील मुद्दे देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे, या सरकारमध्ये शिवसेना हा घटक पक्ष असलेच इंडिया आघाडीचा जाहीरनामा पूर्ण करुन घेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, पण महाराष्ट्रासाठी ज्या काही गोष्टी प्राधानान्ये व्हायला हव्यात केंद्र सरकराच्या मदतीने त्या आम्ही शिवसेनेच्या वचननामाच्या रुपाने प्रकाशित करतो आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
महाविकास आघाडीचं सरकार गद्दारी करुन पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एककलमी कार्यक्रम हे पोकळ इंजिन सरकार करत आहे. त्याला केंद्राचा आशिर्वाद आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जात आहेत. महाराष्ट्रात येणारे उद्योगंदे पळवले जात आहेत.
 
हिरे व्यापार, हिरे बाजार पळवला, क्रिकेटची मॅच पळवली, फिल्म फेअर कार्यक्रम पळवला. महाराष्ट्राचं वैभव लुटलं जात आहे असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र लूट आम्ही थांबवू आणि महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ असं आश्वासान उद्धव ठाकरे यांनी दिलंय.
 
देशात आणि महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर जो काही खड्डा मोदी सरकारने महाराष्ट्रात पाडला आहे, तो भरून काढू आणि महाराष्ट्राचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त करुन देऊ असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. आम्ही गुजरातचे काही ओरबाडून घेणार नाही. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक राज्याचा मान ठेऊ, सर्व राज्यांचा आदर ठेऊ, पण वित्तीय केंद्र नव्याने महाराष्ट्रात उभारू, ज्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
 
आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर उणिवा आहेत, जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध करुन रुग्णालयं अद्ययावत केली जातील. काही ग्रामीण रुग्णालयात आरोग्य यंत्रणा अद्ययावत केली जातील.इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकर्‍यांना कर्जमुक्त केलं जाईल, महाराष्ट्रात आम्ही केवळ कर्जमुक्त करुन थांबणार नाही तर शेतकर्‍यांना जो पीकविमा मिळतो, त्या पीकविम्याचे निकष बदलेले जातील, शेतकर्‍यांना नुकसाानभ भरपाई मिळाली पाहिजे.
 
शेतकर्‍यांची खतं, बी-बियाणं, शेतीची अवजारं जीएसटी मुक्त करु, जेणेकरुन शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट होईल. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकर्‍यांना हमीभाव दिला जाईल. कृषीखात्यामध्ये सर्वे करणारे केंद्र स्थापन करणार असल्याचंही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वचननाम्यात नमुद करण्यात आलं आहे.
 
महिलांना संकटसमयी व अन्यायाप्रसंगी तात्काळ मदत मिळावी म्हणून शासनाच्या मदतीने ’एआय चैट- बोट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना शासकीय मदत उपलब्ध करून देणार शासकीय यंत्रणा तसेच योजनेत महिलांचा योग्य सन्मान राखला जाईल व त्यांना पुरुषांएवढ्याच सुविधा व संधी उपलब्ध करून देणार.
 
इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसने महिलांसाठी ’महालक्ष्मी’ योजना जाहीर केली असून या योजनेप्रमाणे प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी १ लाख रूपये देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. इंडिया आघाडी सरकारकडून या योजनेची त्वरीत व प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सदैव सतर्क राहतील. महिलांबद्दल जाहीरपणे अपशब्द वापरणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल.
 
महाराष्ट्रातील युवक-युवतींना जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातच मिळवून देणार. महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातील शिक्षण.आधुनिक युगातील मागणीनुसार बदलणार संशोधन, कौशल्य, विकास यांना प्राधान्य दिले जाणार. युवक-युवतींचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार.
 
खेळ व खेळाडूंसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणार शासनाच्या सहकार्याने ’सुरक्षित व आनंदी शाळा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि मानसिकता याकडे विशेष लक्ष देण्यासाठी आग्रही राहणार मधुमेह व इतर यांसारखे आजार असणार्‍या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जावे यासाठी योजना राबविणार.
 
वैद्यकिय महाविद्यालयात चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात व हिंदुस्थानात खास करून महाराष्ट्रात उत्तम दर्जाचे प्रशिक्षित डॉटर निर्माण व्हावेत यासाठी केंद्र आराखडा तयार करणार. सरकारच्या मदतीने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी उद्योगजगता विकास, संगणकीय भाषा (उजऊखछॠ), खगोल शास्त्रज्ञ, आर्थिक साक्षरता यासारख्या क्षेत्रात युवक सुशिक्षित व्हावेत यासाठी शिक्षण क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार, केंद्र शासनामार्फत यासाठी विशेष आर्थिक सहाय्यता देणारी योजना आणणार-अभिजात मराठी
केंद्र व महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असूनही केवळ महाराट्र व भरतीवरच्या आकाराची माणसाची ही न्याय कमल इंजिन सरकार असूनही काळजाता था दशा मिळवून देण्यास सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.यावेळी देशाची निवडणूक भारत सरकार ऐवजी मोदीसरकार या नावाने लढविली जात आहे.
 
त्यामुळे त्या मोदी सरकारला सुज्ञ मतदारांनी काही प्रश्न विचारायला हवेत. त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही तर मोदी सरकारला मत देणे मोठी चूक ठरणार आहे. २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते त्याचे काय झाले? ऊन-वारा-पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी असताना शेतकर्‍यांना आंदोलन करण्याची वेळ का येत आहे? प्रत्येकाच्या खात्यात रूपये १५ लाख जमा होणार होते त्याचे काय झाले? त्याऐवजी उद्योगपतींचे रूपये सव्वादोन लाख कोटी कर्ज का माफ करण्यात आले? वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होतात, त्यानुसार १० वर्षांत ही संख्या २० कोटी होते.
 
त्या नोकर्‍याचे काय झाले? गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती इतया कशा गगनाला भिडल्या ? देशात १०० स्मार्ट सिटी निर्माण होणार होत्या त्या कुठे गेल्या? गंगा मईया स्वच्छ का झाली नाही? भ्रष्ट राजकारणी जेलमध्ये टाकण्याऐवजी स्वपक्षात का घेतले? नोटबंदी मुळे काय साध्य झाले ? महाराष्ट्राचे हक्क आणि अस्मिता पायदळी का तुडविली जात आहे? देशावर १ लाख कोटी रूपयांचा कर्जाचा बोजा का वाढविला ? अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले ? असे सवाल ठाकरे यांनी विचारले आहेत.