मातृवंदना योजनेचे अनुदान मिळण्याची ‘नो गॅरंटी’

लोकसभा निवडणुकीनंतरच पोषण आहाराचे वाटप होईल, अंगणवाड्यांची माहिती

By Raigad Times    26-Apr-2024
Total Views |
poladpur
 
पोलादपूर | तालुयातील माताबाल पोषण आहार गेल्या चार महिन्यांपासून रखडला असून लोकसभा निवडणुकीनंतरच पोषण आहाराचे वाटप होईल, अशी माहिती पोलादपूर शहरातील तसेच तालुयातील अंगणवाडयांतून देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांची नांवे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी दोन वेबसाईटसच्या नादुरूस्तीची चर्चा झाली आहे.
 
देशभरात अशीच परिस्थिती असल्याचे सांगून संबंधित खात्यांच्या सरकारी अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपासून अनुदान मिळण्याची नो गॅरंटी असल्यासारखे अवस्था दिसून येत आहे.देशातील दारिद्रय रेषेखालील व दारिद्रयरेषेवरील महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत राज्यात १ जानेवारी २०१७ पासून तीन टप्प्यात ५ हजार रूपये रकमेचा लाभ थेट बँक अथवा पोस्टाच्या खात्यात जमा केला जाण्याचा शासननिर्णय ७ डिसेंबर २०१७ पासून अंमलात येऊ लागला.
 
राज्यात सरकारी रूग्णालयामध्ये गर्भवती महिलेने नोंद केल्यानंतर वेबपोर्टलवरून आशा सेविका अथवा फिड फंशनरी यांनी सदर महिलेची माहिती अपलोड करायची आहे असे सांगण्यात आले. पोलादपूर शहरातील गर्भवती आणि प्रसुती झालेल्या महिलांसह तालुयातील अनेक गर्भवती आणि प्रसुती झालेल्या महिलांची माहिती या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात वेबपोर्टलवर अनेक अडचणी आल्याने दुसर्‍या वेबसाईटवरून माहिती अपलोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 
पोलादपूर तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय पोलादपूर पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीमागील जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आले असून याठिकाणी महिला लाभार्थ्यांची माहिती नव्याने अपलोड केली जात असल्याचे सांगण्यात आले. २०२० पासून आतापर्यंत अनेक महिलांना उडवाउडवीची, वेबपोर्टलमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने पुन्हा माहिती अपलोड करावी लागल्याची तसेच तुमचे बँक खाते तपासून बघा, अशी मोघम उत्तरे देण्यात आली आहेत.
 
यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांनी संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती विखे व डीआरसीएच डॉ.शिंदे यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे सांगून दोन्ही अधिकार्‍यांनी सर्व लाभार्थ्यांची यादी तयार आहे. परंतु १ एप्रिल २०२३ पासून पोर्टल मध्ये बदल झाल्या कारणाने रजिस्ट्रेशन करताना तांत्रिक अडचणी येत आहेत.
 
मंत्री ना.अदिती तटकरे यांनी महिलांच्या प्रश्नी तातडीने लक्ष घातल्याने नजिकच्या काळामध्ये मातांना नवीन जीआर नुसार मिळणारा लाभ तसेच जुन्या जीआर नुसार मिळणारा लाभ खोळंबलेली परिस्थिती दूर होण्यास मदत होईल, असे पोलादपूर तालुयातील वैद्यकीय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
 
मात्र, या घटनेस एक वर्ष झाल्यानंतर आता अधिकारी मौन बाळगून आहेत. काही महिला कर्मचारी व अंगणवाडी सेविका तसेच डाटाएन्ट्री ऑपरेटर्स या देखील या योजनेच्या लाभार्थी असून आमचेपण आले नाही पहिल्या बालकाचे तर दुसरे अपत्य जन्माला येऊन तरी मिळतील की नाही सांगता येत नसल्याचे प्रतिक्षेतील लाभार्थी महिलांना सांगत असल्याचे सांगत असल्याने या योजनेची नो गॅरन्टी असल्याचे उघड झाले आहे.
 
ग्रामीण भागातील माता-बाल पोषण आहार पुर्वीप्रमाणेच महिला व बालकल्याण विभागाकडून मिळत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, चार महिन्यांचा एकत्रित पोषण आहार मिळेल असे सांगणार्‍या या यंत्रणेला, माता-बालकांची भूक किती महिने थांबवता येईल हा प्रश्न आहे.दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांनी समस्येचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाचे उपसचिव शिवराज धुळे यांच्याकडे चौकशी केल्याचे समजते.