अलिबाग बुरुमखाण येथे तरुणाची हत्या

25 Apr 2024 16:56:22
 alibag
 
अलिबाग | दोघांमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना अलिबाग तालुयातील बुरुमखाण आदिवासीवाडी येथे घडली. अजय संतोष वाघमारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.असल्याबाबतची तक्रार अर्चना अजय
वाघमारे (वय २४ वर्षे) हीने अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.
 
यातील राहुल उदय वाघमारे यास अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील बुरूमखान आदिवासी वाडी येथे संतोष बाळू वाघमारे,(वय ४५) राहुल उदय वाघमारे यांच्यामध्ये जुन्या वादावरून २२ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भांडण झाले.
 
संतोष वाघमारे यांचा मुलगा मयत अजय संतोष वाघमारे हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता राहुल वाघमारे याने दोन्ही हाताने त्याचा गाळा पकडुन त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसून पुन्हा गळा दाबला तसेच गुडघ्याने छातीवर आणि पोटावर मारहाण केली.
 
अजय वाघमारे जागीच बेशुद्ध पडला.त्याला त्याची पत्नी अर्चना अजय वाघमारे आणि इतर लोकांनी औषध उपचार करता जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केले. आरोपी राहुल हा जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर डिस्चार्ज दिल्यानंतर अटक करण्यात आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0