सुनील तटकरेंनी शरद पवारांचे घर फोडले - जितेंद्र आव्हाड

By Raigad Times    25-Apr-2024
Total Views |
mangoan 
 
माणगाव | सुनील तटकरेंना मंत्री केले, मुलीला मंत्री केले. एका कुटूंबात पाच पदे दिली; मात्र त्यांनी शरद पवार यांना फसवले. शरद पवार यांचे घर फोडण्याचे काम सुनील तटकरे यांनीच केल्याचा आरोप माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बॅ.अंतुलेंनाही त्यांनीच फसवले आणि आता ते जावयाला घेऊन फिरत असल्याचेही म्हणाले.रायगड लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सभा मंगळवारी (२३ एप्रिल) मोर्बा येथे पार पडली.
 
यावेळी जितेंद्र आव्हाड आणि शेकापचे नेते आ.जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंवर अक्षरशः आगपाखड केली. सकाळी सात वाजले की तटकरे घरी असायचे.२०१४ पासून त्यांचा भाजपसोबत चला असा आग्रह पवारसाहेबांकडे सुरु होता,असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
 
बोर्लीपंचतन येथे कोकणी लोकांच्या शिक्षणासाठी डॉ. उंड्रे यांनी मध्ये ट्रस्ट काढला.आज तटकरेंच्या लोकांनी त्या ट्रस्टवर कब्जा केला आहे. डॉ.उंड्रे यांच्या कुटूंबियांवर दडपशाही केली जात आहे असा आरोप आव्हाड यांनी केला. ही अस्तित्वाची लढाई आहे. ही निवडणूक हरलो तर २०२९ ची निवडणूक होणार नाही.
 
तटकरें विरोधातील लढाई नाही. संसदीय लोकशाही, संविधान टिकवण्यासाठी मतदान करा, असे आवाहन आव्हाड यांनी केले.तटकरे परत आले तर जवळ करु नका -आ.जयंत पाटील
 

mangoan 
 
लोकसभा निवडणुकीनंतर सुनील तटकरे तुमच्याकडे परत आले तर जवळ करू नका, अशी विनंती शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली. जिल्ह्यात शेकापची पाच लाख मते, म्हणून शेकाप ज्यांच्या बाजूने त्यांचा विजय होतो, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
 
त्यामुळे मावळ आणि रायगड मध्ये इंडीया आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मोदींच्या ४०० पारचा भ्रमाचा भोपळा फोडण्याची ताकद सामान्य माणसाच्या बोटात ताकद आहे. सका पाटीला यांचा जॉर्ज फर्नांडीस यांनी केलेला पराभव केलाचे उदाहरण सुभाष देसाई यांनी दिले. आता सामान्य जनता मोदींच्या गॅरंटीला भुलणार नाही, जनता जागृत आहे.
दिशा आणि दृष्टी बदलली आहे असेही ते म्हणाले तटकरेंना गुलाल लागणार नाही.- सुषमा अंधारे
 
ही खासदारसाठी लढाई नाही,शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात ही लढाई आहे. निवडणुकीनंतर तटकरेंना गुलाल लागणार नाही. गद्दारी विरोधातील मशाल पेटणार आहे.विजयाची तुतारी आमचीच वाजेल.रायगड लोकसभेची निवडणूक ही गद्दारी विरुध्द खुद्दारी अशी आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी केली.