एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सत्ता पाहिली! श्रीरंग बारणे यांची उद्धव ठाकरेंवर टिका

25 Apr 2024 12:19:24
khopoli
 
खोपोली | आतापर्यंत मी नऊ निवडणूका लढलो आणि जिंकलो. सत्तेतही होतो; परंतु सत्ता आमच्या नव्हती. एकनाथ शिंदे मुख्यंमत्री झाल्यानंतर खर्‍या अर्थाने सत्ता पाहिली, अशी टिका श्रीरंग बारणे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. खालापूर येथे ते बोलत होते.
 
मनेसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर मनेसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी खालापूरात येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ‘मी संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता’ असल्याचे बारणे म्हणाले.
 
आतापर्यंत महापालिकेच्या पाच,विधानसभेच्या दोन, लोकसभेच्या दोन निवडणूका लढलो आणि जिंकलोही; पण शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच सत्ता अनुभवता आल्याचेही ते म्हणाले.मनसेचे पदाधिकारी यांच्याशी कधीही संपर्क नव्हता, तरी निवडून आल्यानंतर पक्षभेद न करता सर्वांची कामे केली आहेत.
 
याही निवडणुकीनंतर आपण एकत्रित मिळून विकासात्मक कामे करू, असे श्रीरंग बारणे म्हणाले.शिवसेना आणि मनसे यांची विचारधारा एकच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊनच दोन्ही पक्ष काम करीत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये काही मतभेद असले तरी मनभेद कधीच नव्हते, असेही सरदेसाई म्हणाले.महाराष्ट्र सैनिकांसाठी राज ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो.
 
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅट्ट्रीकसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरेल, अशी ग्वाही सरदेसाई यांनी दिली. यावेळी राज ठाकरे यांचा निर्णय दूरदृष्टीचा आहे, असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केले.
 
यावेळी चित्रपट सेनेचे प्रमुख अमित खोपकर, मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी रणजीत शिरोळे, जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील,उपजिल्हाप्रमुख जे.पी.पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, मनसेचे पिंपरीचिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच विजय पाटील, योगेश चिले व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरंग बारणेंचा गावडाई झोलाई मातेला नवस
 
खोपोली | मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी रानसई गावातील गावडाई झोलाई मातेला विजयाची हँट्रीक करण्यासाठी शंभर नारळांचे तोरण बांधण्याचा नवस केला आहे.श्रीरंग बारणे यांनी गत निवडणुकीमध्ये गावडाई झोलाई मातेच्या मंदीरातून नवस केला होता.
 
khopoli
 
निवडून आल्यानंतर बारणे यांनी शंभर नारळाचे तोरण बांधले होते. म्हणून यंदाही त्यांनी खालापूरातील प्रचाराचा शुभारंभ गावडाई झोलाई मातेच्या मंदीरातून केला. ते मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी खालापूर तालुयातून प्रचाराला सुरुवात केलीआहे.
 
या मतदारसंघांतील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची मोठी ताकद आहे. त्यामुळे मला शंभर टक्के विजयाची खात्री असल्याचा विेशास महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
 
Powered By Sangraha 9.0