संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; मावळमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन

24 Apr 2024 13:09:03
 khopoli
 
खोपोली | मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (२३ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे,काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे,शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,आमदार रोहित पवार, शिवसेना उप-
नेते सचिन अहिर या प्रमुख नेत्यांची उपस्थित होती.
 
यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.पिंपरीगाव येथून सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात झाली. पुढे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शगून चौक, काळेवाडी, चिंचवडगाव महासाधू मोरया गोसावी मंदिर, क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन मार्गे आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे रॅली पोहोचली.
 
खंडोबा माळ येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदयात्रा सुरू होऊन म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पदयात्रेचा आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे समारोप झाला. आज दुपारी अडीचच्या सुमारास वाघेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
 
याप्रसंगी संपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, माजी आमदार बालाराम पाटील, सभापती नगरसेवक अभिमन्यू दहीतुले, बाबुजी नायर, कौस्तुभ नवले युवक अध्यक्ष, उमेश खंदारे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय, नरेंद्र बनसोडे वरिष्ठ उपाध्यक्ष, किरण खाजेकर आबा खराडे, संदेश नवले, डॉ मनिषा गरुड, रवी नांगरे, जितू छाब्रा, फिरोज तांबोळी, इरफान शेख, सुनील राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष व इतर संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0