रायगडच्या विकासाचा पुढील ५ वर्षांचा रोड मॅप तयार-तटकरे ; पेणमध्ये महायुतीची जाहीर सभा

24 Apr 2024 12:15:47
 pen
 
पेण | रायगड जिल्ह्यातील विकासकामांचा पुढील ५ वर्षांचा रोड मॅप मतदारांसमोर सादर केला आहे. सर्वधर्म समभाव राखला जावा म्हणून काम करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. त्यामुळे मुस्लिम समाज आपल्या पाठीशी उभा राहणार आहे. ज्यांनी मला निवडणुकीत मदत केली त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे.
 
आता घड्याळ चिन्हावर मला निवडून आणलात तर त्याची परतफेड म्हणून या पेण मतदारसंघातील युतीचा जो आमदार असेल तो सर्वाधिक मताधिय देऊन निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो, असा शब्द महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिला. पेण तालुयातील आगरी समाज हॉल येथे मंगळवारी (२३ एप्रिल) महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी तटकरे बोलत होते.
 
घड्याळाला मत म्हणजे राष्ट्रहिताला मत आणि घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत. आणि मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नसून महायुतीचा खासदार असल्याचेही म्हणाले.पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी यावेळी पेण रेल्वे स्थानकाचा प्रश्न उपस्थित केला.
 
यावर बोलतांना तटकरे यांनी, पेण पासून सीएसटीपर्यंत लोकल सुरु करण्याची जबाबदारी आता मी घेतली आहे. पेणच्या या लोकलमुळे पेण तालुयातील तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. २०५० पर्यंत पेणच्या लोकसंख्येचा विचार करुन पिण्याच्या पाण्याची तरतूद केली जाईल.
 
आचारसंहिता लागू आहे याचे भान मला आहे, पण तुमच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विलंब लागणार नाही, असेही ते म्हणाले. पेण तालुयातील गावखेड्यात फोर-जी आणि फाईव्ह-जी नेटवर्क उभे केले जाईल. जगाच्या पाठीवर गणपतीच्या मूर्ती तयार करणारे एकमेव पेण हे शहर आहे.
 
श्री गणेश मूर्तीबाबत पर्यावरण विभागाने काही अटी टाकल्या आहेत. हा प्रश्न लोकसभेत सोडविण्याचा प्रयत्न.करेन. तसेच वसई विरार कॉरिडॉर झाल्यानंतर पेणला त्याचा लाभ होणार; पण त्या वेळेला भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.
 
मतदाराच्या रुपाने मी पेणकर असल्याने या शहराचा कालबद्ध पध्दतीने विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही ओशासन सुनील तटकरे यांनी जनतेला दिले. यावेळी आमदार रविंद्र पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार अनिकेत पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील यांनीही आपले विचार मांडले.
 
या सभेला युवा नेते मंगेश नेने, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजप शहर प्रमुख हिमांशु कोठारी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, गट नेता अनिरुद्ध पाटील, यशवंत घासे, दयानंद भगत, दीपक गुरव, सुनिता जोशी, संदीप ठाकूर, आजी माजी नगरसेवक आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0