अधिकारी निवडणुकीत व्यस्त, कर्जतमध्ये जंगले होताहेत फस्त

By Raigad Times    22-Apr-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत | देशात लोकसभा निवडणुका सुरू असून सर्वच अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. याचाच गैरफायदा घेत,
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरु आहे. जमिनी सपाटीकरण करण्याच्या नावाखाली हे सर्व सुरु आहे.कर्जत तालुका मोठ्या प्रमाणात जंगल असलेला तालुका म्हणून ओळखला जायचा.
 
मात्र सध्या निवडणूक काळात आपल्याला कोणी अडवायला येणार नाही, अशी खात्री असल्याने मोठ्या प्रमाणात जंगलतोड रात्रंदिवस सुरू आहे. तालुयात कर्जतपासून खांडस आणि झुगरे वाडी पासून बीड आणि बेडिसगावपासून कर्जत अशा प्रत्येक भागात जंगलतोड सुरू असून राखीव जंगलदेखील तोडले जात आहे.
 
त्यात कर्जत तालुयात सर्वात जास्त जंगलतोड कशेळे परिसरात कळंबपासून आंबिवली भागात सुरू आहे. काही स्थानिक शेतकर्‍यांनी परवानगी घेतली आहे, मात्र जंगल तोडणारे ठेकेदार हे मोजून दिलेल्या जागेपेक्षा अधिक प्रमाणात जंगलाची तोड करताना दिसत आहेत. वन विभागाने या जंगलतोडीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 
अन्यथा कर्जत तालुयात आगामी काळात जंगल शोधावे लागण्याची शयता यामुळे निर्माण झाली आहे. कर्जत तालुयात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून कर्जत तालुयाच्या प्रत्येक भागात जमीन विकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विकत घेतलेल्या जमिनीवर खड्डे भरण्यासाठी असलेले डोंगर फोडण्यासाठी सपाटीकरण केले जात आहे.
 
जमिनीचे सपाटीकरण करताना तेथील लहान मोठी झाडे तोडण्यात येत आहे. थोडीशी रॉयल्टी भरायची आणि त्याच्या दहापट जमिनीचे उत्खनन करायचे असे प्रकार सुरू असून झाडे मुळासकट नष्ट होत असून असे सर्व प्रकार रोखण्याची गरज आहे. - उदय पाटील, सामाजिक कार्यकर्ते
आपल्या भागातील झाडांचे घटते प्रमाण लक्षात घेवून वृक्षारोपण लागवड स्पर्धा व्हायला हवीत.प्रत्येक महिन्याला झाडे लावून त्यांचे फोटो आपल्या मोबाईलचे स्टेटस म्हणून ठेवावेत अशी आपली इच्छा आहे.- विकास चित्ते, निवृत्त अधिकारी