खोपोली | वर्‍हाडाच्या बसला भीषण आग, बस जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही

By Raigad Times    22-Apr-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | मुंबई-पुणे एस्प्रेस वेवरुन लग्नाचे वर्‍हाड घेऊन निघालेल्या बसला खोपोलीजवळ भीषण आग लागली. संपूर्ण बस
आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमधून सुमारे ४२ प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
 
ही बस मुंबईहून सोलापूरकडे वर्‍हाड घेऊन निघाली होती. रात्री दोनच्या सुमारास ही बस मुंबई-पुणे एस्प्रेस वेवरील खोपोलीजवळ आली असताना या बसला आग लागली. आग भडकल्याचे दिसताच प्रवाशांनी प्राण वाचविण्यासाठी आरडाओरड करत मदतीसाठी याचना सुरू केली.
 
दरम्यान, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असणार्‍या संस्था यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले. या बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे बसला आग लागल्यानंतर तातडीने मदत पोहोचली नसती तर या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असती. दरम्यान, समोर येत असलेल्या प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याचे सांगितले जात आहे.