जलजीवन योजनेच्या कामात माणगाव अग्रेसर , २०२५ पर्यंत मिळणार सर्वांना पाणी

१५३ कामांपैकी ७७ पूर्ण, ७६ कामे प्रगतीपथावर

By Raigad Times    22-Apr-2024
Total Views |
mangoan
 
माणगाव | माणगाव तालुयात शासनाने १५३ जलजीवन मिशन योजनेची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ७७ कामे
पूर्ण झाली असून, ७६ कामे प्रगतीपथावर आहेत. ती २०२५ पर्यंत पूर्ण होतील, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. रायगड
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन योजना राबविली जात असली तरी माणगाव तालुका हा जलजीवन योजनेच्या
कामात जिल्ह्यात अग्रेसर दिसत आहे.
 
यंदा मार्च महिन्यापासूनच काही गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु झाली आहे.दिवसेंदिवस उष्णता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने माणगाव तालुयातील काही गावातील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. शासन या गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही.
 
मार्च महिन्यापासून माणगाव तालुयातील २४ गावे व ३२ वाड्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असले तरी तालुयातील अनेक गावांना पाणी टंचाईशी सामना यापुढील काळात करावा लागणार आहे, हे वास्तव आहे. ही गावे पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी शास-नाने जलजीवन मिशन योजनेतून सर्वांना पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
 
१५३ जलजीवन मिशन योजनेच्या कामापैकी २८ कामे भौतिकदृष्ट्या तर ४९ कामे आर्थिकदृष्ट्या असे एकूण ७७ पाणी योजना पूर्ण केल्या असून या गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरित ७६ पाणी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.जलजीवन मिशन योजनेंतर्गत माणगाव तालुयातील गाव, वाडी या योजनेपासून वंचित राहणार नाही. यासाठी शासनाने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
 
जिथे पाण्याचे स्तोत्र नाही. तिथेही जलजीवन योजना राबविण्यात आले आहे. प्रगतीपथावर असणारी ७६ कामे ही शासनाने ठरवून दिलेल्या २०२४-२५ या कालावधी पूर्वीच पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्वांना पाणी मिळणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा, माणगाव उपविभाग कार्यालयात सहा शाखा अभियंता पदे मंजूर आहेत.पैकी सर्व पडे रिक्त आहेत. तरीही माणगाव उपविभागीय उपअभियंता प्रशांत म्हात्रे यांनी ही कामे पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे रायगड जिल्ह्यात माणगाव तालुका हा पाणी पुरवठा जलजीवन मिशन कामे पूर्ण करण्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे.