सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसचीही केली रेकी ; १ लाख अ‍ॅडव्हान्स घेवून, सलमानच्या घरावर गोळीबार

By Raigad Times    18-Apr-2024
Total Views |
 panvel
 
पनवेल | सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी दोघा हल्लेखोरांना सुरुवातीला जवळपास एक लाख रुपये देण्यात आले होते. त्या पैशातून दोघांनी पनवेलमध्ये घर भाड्याने घेतले होते. सेंकड हँड बाइक खरेदी केली होती. तसंच, त्यातूनच रोजचा खर्च करत होते. सलमानच्या फार्महाउसचीही रेकी केली होती.
 
काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाकीचे पैसे देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आले होते.बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी दोघा आरोपींनी गोळीबार केला होता. त्यानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. सलमानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी लाँरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे.
 
अनमोल बिश्नोई याने एक फेसबुक पोस्ट करत धमकीवजा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक केली आहे. आता या घटनेत अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत.सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी गुजरातच्या भूजमध्ये पोहोचले. तिथे दोघांनी एका मंदिराचा आसरा घेतला.
 
पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागला आणि त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचला. मंदिरात झोपलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पुजार्‍यांच्या वेशात मंदिरात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून बाईक जप्त केली.
 
एका व्यक्तीने ही बाईक पनवेलच्या एका शोरुममधून सेकंडहँड विकत घेतली होती.ही बाईक त्याने २४ हजार रुपयांना आरोपी विक्की आणि सागरला विकली. बाईक विकत घेण्यासाठी आरोपींनी आधार कार्ड, रेंट अ‍ॅग्रीमेंट अशी खरी कागदपत्र सादर केली. रेंट अ‍ॅग्रीमेंटमधल्या पत्त्याच्या आधारे पोलीस आरोपींच्या घरापर्यंत पोहोचले.
 
तिथे पोलिसांनी घराच्या मालकाकडून विक्की आणि सागरचे मोबाईल नंबर घेतले. मोबाईल नंबर ट्रेस केला असता दोघंही गुजरातमधल्या भूज इथं असल्याचं पोलिसांना कळले. तीथून पोलीसांनी त्यांना अटक केली.मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान सलमान खानच्या घरापासून एक किमी दूर असलेल्या हॉटेल ताज लँड्स अँडच्या जवळपास पाहण्यात आले होते.
 
पोलिसांना संशय आहे, सागर पाल हा लाँरेन्स गँगच्या संपर्कात आला होता. तो दोन वर्षांपर्यंत हरियाणामध्ये राहत होता. त्याचवेळी तो लाँरेन्स गँगच्या संपर्कात आला होता. तर, दुसरा विक्की गुप्ता याने नंतर सागरला जॉईन केले.तत्पूर्वी या दोघांनाही सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊसपासून जवळपास १३ किमी दूर भाड्याने घर खरेदी केले होते.
 
इथूनच त्यांनी फार्महाऊसचीही रेकी केली होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाकीचे पैसे देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळेच त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी चंपारण ते मुंबई सेंट्रलपर्यंतचा प्रवास केला होता.घर भाड्याने घेतल्यानंतर दोघांनीही रेंट अ‍ॅग्रीमेंटदेखील बनवले होते. त्यासाठी त्यांना स्वतःचे खरे आधारकार्ड देखील दिले होते.
 
त्यांनी घर मालकाला १० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स जमा केले होते आणि दरमहिना ३५०० रुपये भाडे देत होते. पनवेलमध्ये काही दिवस राहिल्यानंतर ते १८ मार्च रोजी चंपारणला निघून गेले. त्यानंतर १ एप्रिल रोजी दोघे परत आले. त्यानंतर १४ एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता मोटारसायकलवर स्वार होऊन दोघांनी वांद्रे येथील सलमान खानच्या घरावर गोळीबार केला