श्रीरंग बारणेंचा अभ्यास कमी; संजोग वाघेरेंचा निशाणा

By Raigad Times    18-Apr-2024
Total Views |
 pimpri
 
पिंपरी- चिंचवड | बारणेंचा अभ्यास कमी आहे. असं वाटतंय. त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मग बोलावं. अस प्रतिउत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना दिले आहे. बारणे यांनी विरोधी उमेदवाराला ओळखत नाही, असं विधान केलं होतं.
 
यावर बोेलताना, बारणेंना कुणीतरी सांगा माझं अवघं कुटुंब राजकारणी आहे. मला पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सर्वजण ओळखतात. तरी देखील ते मान्य करत नसतील तर बारणेंनी अभ्यास करावा असा टोलाही संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत हाणला.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विरोधकांना पराभव दिसत असल्याने अशी वक्तव्य करत आहेत, अशी टीका केली होती.
 
वाघेरे म्हणाले, बारणेंना सांगा, माझी पत्नी तीन वेळा निवडून आलेली आहे. मी महापौर होतो, माझे वडील महापौर होते.
या गावचे ते सरपंच ही होते. हे सर्व बघता बारणेंचा अभ्यास कमी आहे. असं वाटतंय. त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मग बोलावं. अस प्रतिउत्तर वाघेरे यांनी बारणेंना दिलं आहे. वाघेरे आणि बारणे यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु, दोघांपैकी खासदार म्हणून कोणाला मावळची जनता निवडून देणार हे येणारा काळ ठरवेल.