कोकणात ज्यांनी मनसे संपवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचे काम करणार कसे?

मनसे कार्यकर्त्यांमध्ये संताप? वैभव खेडेकर यांनी मांडली भुमिका

By Raigad Times    18-Apr-2024
Total Views |
ratnagiri
 
रत्नागिरी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहिर केल्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी गेली २० वर्ष मनसे पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये टाकलं.
 
पक्ष, नगसेवक फोडले अशांना मदत करणार अशी असा सवाल त्यानी उपस्थित केला आहे.नुकतीच मनसेच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची बैठक पार पडली. सर्व मनसेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी काही कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या. ही तीव्रता कमी व्हायला थोडा वेळ लागेल असे मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी, यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगीतले. असे असले तरी साहेबांचा आदेश पाळला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
 
कोकणात मनसेची वाटचाल संघर्षमय राहिली आहे. आमच्या कार्यकर्त्यांच खच्चीकरण केलं. त्यांच्या व्यवसायात अडथळे आणले. खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार? या संदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करु. सातत्याने झालेला अन्याय, अवहेलना या व्यथा त्यांच्यासोमोर मांडू असं वैभव खेडेकर म्हणाले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी कशी करायची? असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये आहे. या आमच्या सगळ्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यांच्यासमोर आम्ही हे सर्व मांडणार आहोत. आम्ही राज ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत असेही ते म्हणाले.
सुनील तटकरे यांनी कुठली विकास कामे केली?
महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी मागच्या पाच वर्षात कुठलीही विकासकाम केली नाहीत, असा आरोप खेडेकर यांनी केला. तसेच सुनील तटकरे यांनी कोकणातील, खेड, दापोली, मंडणगड येथील नगर पालिकेत कुठलेही विकास कामे केले नाहीत असेही ते म्हणाले. मदत केल्यानंतर सत्तेचा जो वाटा असतो ते कधीही विचारला नाही. भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे.