रायगड जिल्ह्यात उष्मालाट ! कमाल तापमान ४० अंशापर्यंत

By Raigad Times    17-Apr-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्याचा बुधवारी काही ठिकाणी उष्मालाटेच्या झळा नागरिकांना बसल्या. तापमान ४० अंशापर्यंत गेले होते. आजदेखील (१७ एप्रिल ) हवामान विभागाने रायगडला यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात उष्मालाट उद्भवण्याची शयता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. असह्य उकाड्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
 
तापमानाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने समुद्र किनारी देखील गरम हवेच्या वाफा वाहत असल्याचे जावणत आहे. समुद्रकिनारी भागातील हवेत मिठाचे प्रमाण असल्याने दमट हवामान नेहमी असते. त्यात घामाने अंग चिंब झाल्यानंतर अक्षरशः अंगाला खाज सुटते.प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांच्याकडून रायगडला आजसाठी एलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
तर गुरुवारपासून परिस्थिती पर्वपदावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे अतिआवश्यक असल्यास नागरिकांनी काय करावे व काय करू नये, या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले आहे.काय करावे?पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
 
दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घरी बनविण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
 
अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉटरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेड चा वापर करण्यात यावा.
 
तसेच रात्री खिडया उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
काय करू नये?
उन्हात अती कष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान
घराबाहेर जाणे टाळा. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.
 
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडया उघडी ठेवण्यात यावीत