पेण तालुयातील यात्रांच्या हंगामाला सुरुवात

By Raigad Times    16-Apr-2024
Total Views |
 pen
 
पेण | पेण तालुयातील यात्रांना रामनवमीपासून सुरुवात होत आहे. तालुयातील वाशी, वढाव, बोरी,कळवे, रावे दादर या गावांसह इतर गावांमध्ये यात्रांना सुरुवात होत असून, या यात्रांसाठी मोठी गर्दी उसळणार आहे. या यात्रांमधून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते.
 
एकीकडे सुरू झालेला चैत्र महिना व दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरूअसतानाच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तानंतर रायगड जिल्ह्यातील विविध तालुयांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी आगरी-कोळी बांधवांची इष्टदेवता असणारी कार्ला येथील एकविरा देवीचा यात्रा उत्सव होताच विविध ठिकाणच्या स्थानिक ग्रामदेवतांच्या यात्रांना सुरुवात होणार आहे.
 
यंदाच्या यात्रांचे वैशिष्ट म्हणजे निवडणुकीच्या धामधूमित २३ दिवस ग्राम यात्रा व देवतांच्या यात्रेचा यात्रोत्सवाचा जल्लोष पहायला मिळणार आहे.ग्रामदेवतांचा उत्सव साजरा करण्यात येणार असून,यासाठी त्या-त्या ठिकाणच्या ग्रांमस्थ व पंच कमिटीने यात्रांसाठी देवांचा मानपान व इतर गोष्टीची जय्यत तयारी सुरू केली आहे. यात्राप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
 
या ग्रामदेवतांच्या यात्रेत छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांना चालना मिळणार असल्याने व्यापारीवर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.तालुयातील प्रती अयोध्या म्हणून ओळखली जाणारी बळवली गावातील प्रभू श्रीरामांचे मंदिर असलेल्या बळवली गावची यात्रा बुधवार, १७ एप्रिल रोजी आहे. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.
 
या यात्रेसाठी केवळ तालुयातीलच नव्हे, तर राज्यभरातील भाविक यात्रेत हजेरी लावतात. १८ एप्रिल रोजी दादर येथील ग्रामदेवतांची यांत्रा तर वढाव येथील काळभैरव देवाची यात्रा २१ एप्रिल रोजी आहे. तालुयातील सर्वात मोठी समजली जाणारी वाशी येथील वरसूबाय जगदंबा भवानी देवीची यात्रा २२ एप्रिल रोजी आहे.
 
या जत्रेत आकाश पाळणे, मनोरंजनांचे खेळ तसेच मेवा-मिठाईची दुकाने यांनी संपूर्ण परिसर गजबजतो. या यात्रेत काठ्या उभारणे हे या यात्रेचे वैशिष्ट असते. याच दिवशी गडव येथे काळबादेवीची यात्राही भरते. या यात्रेत उंचच उंच देवकाठ्याची स्पर्धा या यात्रेचे मुख्य आकर्षण आहे.
 
या देवकाठ्या स्पर्धेची जोरदार तयारी ग्रांमस्थ करीत आहेत. या यात्रेला गडब, कारावी व कासु परिसरातील भाविकांसह मुंबई व ठाण्यात राहणारे हजारो भाविक हजर असतात. २३ एप्रिल रोजी बोरी येथील आक्कादेवीची, पांडापूर गावची यात्रा आहे. तर कळवे गावातील यात्रा हनुमान जयंतीच्या दिवशी आहे.
 
वरेडी येथील काळभैरव देवाची यात्रा २५ एप्रिलला आहे, तर  कोलेटी येथील यात्रा २८ एप्रिल रोजी भरणार आहे.मे महिन्यात रावे गावच्या आई रायवादेवीची यात्रा बुधवार, ८ मे रोजी भरणार आहे. भव्य काठ्या हे या यात्रेचे वैशिष्ट मानले जाते. त्यानंतर जिते गावची श्री सत्यनारायण देवाची यात्रा ही अक्षयतृतीयेच्या दिवशी म्हणजे शुक्रवार, १० मे रोजी भरत असून, ही तालुयातील शेवटची यात्रा असते. या यात्रेनंतर पेण तालुयातील यात्रोत्सवाची समाप्ती होणार आहे.