महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणार्‍यांविरोधात कामोठे येथे गुन्हा

By Raigad Times    15-Apr-2024
Total Views |
 panvel                 
 
पनवेल | फेसबुकवरुन मैत्रीचे जाळे विणून एका चाळीस वर्षीय महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणार्‍या दोन तरुणांविरोधात कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कामोठे भागात राहणार्‍या एका ४० वर्षीय महिलेसोबत एका तरुणाने फेसबुकद्वारे मैत्री केली होती. हि मैत्री लॉजपर्यंत पोहचली आणि त्या तरुणाने तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले होते.
 
ते फोटो त्याने दुसर्‍या मित्राला पाठवून दिले. त्या तरुणाने सदर महिलेला संपर्क साधला आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यास आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या सुरुवात केली. यानंतरही पिडीत महिला ऐकत नसल्याचे पाहून त्या तरुणाने आक्षेपार्ह फोटो तिच्या पतीला पाठवून दिले. त्यानंतर सदरचे फोटो फेसबुकवरुन सुध्दा व्हायरल केले.
 
यानंतर सदर महिलेने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांविरोधात विनयभंगासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.