रायगडसह वंचितकडून लोकसभेसाठी आणखी १० उमेदवार रिंगणात

By Raigad Times    12-Apr-2024
Total Views |
Mumbai
 
मुंबई | रायगडसह वंचितकडून लोकसभेसाठी आणखी १० उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. कुमुदिनी रविंद्र चव्हाण यांना रायगड लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.महाराष्ट्रात येत्या १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होणार आहे.
 
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. याच पोर्शभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून १० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
 
यात रायगड, उस्मानाबाद, जळगाव, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे.रायगड - कुमुदिनी रविंद्र चव्हाण, नंदूरबार - हनुमंत कुमार मनराम सुर्यवंशी, जळगाव - प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा, दिंडोरी - गुलाब मोहन बर्डे, पालघर - विजया दहिकर म्हात्रे, भिवंडी - निलेश सांबरे, मुंबई उत्तर -बीना रामकुबेर सिंग, मुंबई उत्तर पश्चिम - संजीव कुमार अप्पाराव कलोकोरी मुंबई दक्षिण मध्य - अब्दुल हसन खान असे दहा उमेदवार आहेत.