धाटावमध्ये तरुणाला बेदम मारहाण; तरुण गंभीर जखमी

By Raigad Times    11-Apr-2024
Total Views |
 Roha
 
रोहा | किरकोळ कारणातुन एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रोहा तालुक्यातील धाटाव येथे घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
धाटाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ मंगळवारी (९ एप्रिल) रोजी पावणेदहा वाजता दीपक दगडू पवार (३६, रा. धाटाव) याला मागील भांडणांचा मनात राग धरू, निलेश भोकटे, अजय मोरे, राहुल रटाटे, सागर प्रफुल जाधव, विकी संतोष खैरे, मोन्या जाधव, पीयुष अंबिस्ते यांनी यांनी बेदम मारहाण केली.
 
मंदिराजवळ पडलेल्या विटा, दगड,हातात मिळेत ते घेवून मारहाण करून फिर्यादी यास शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत रोहा पोलीस ठाण्यात भा.द.वी. कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास अशितोष म्हात्रे करीत आहेत.