नवी मुंबईत जोशात निघाल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रा

By Raigad Times    10-Apr-2024
Total Views |
 panvel
 
नवी मुंबई | नवी मुंबई शहरात सकाळपासून स्वागतयात्रा निघत होत्या. मात्र मोठ्या आणि प्रमुख समजल्या जाणार्‍या शोभायात्रा सकाळी साडेदहानंतर निघाल्या. ढोल ताशांच्या गजरात विविध पारंपरिक वेशभूषा करत निघालेल्या शोभायात्रेत मतदान करा असा संदेशही देण्यात आला.
 
महाराष्ट्राची ओळख असलेल्या सणांपैकी शोभायात्रा अर्थात नववर्ष स्वागत यात्रा असली तरी आसाम, दक्षिण भारतीय वेशभूषा, ते राज्याची परंपरा असलेली वारकरी दिंडी पण सामील झाली होती.कोपरखैरणे, घणसोली, तुर्भे सानपाडा येथून निघालेल्या स्वागतयात्रा वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाल्या तर ऐरोली राबले येथील शोभा यात्रा दिवा चौकात विसर्जित झाल्या.
 
दुपारपर्यंत या शोभा यात्रा सुरु होत्या. यात वाशी सेटर २९ येथील स्वामी नारायण मंदिरापासून एक स्वागत यात्रा निघाली तर एम.जी कॉम्पल्स आणि वाशीतील सेटर १४/१५ दत्त गुरू अपार्टमेंट व ए टाइप येथून अशा विविध शोभा यात्रा छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र आल्या होत्या. यात अनेक हिंदू संघटना, इस्कॉन मंदिर बालाजी मंदिर आदींचा समावेश होता.
 
या स्वागत यात्रेत ढोल-ताशा पथक, चेंडा मेलन (दक्षिण भारत वाद्य), बेंजो बिट्स, दुचाकी महिला समुह, आसाम पारंपरिक नृत्य समूह, श्री. स्वामीनारायण गुरुकुल यजरथ, पारंपरिक नृत्य कला समुह, शिवकालीन मर्दानी शस्त्र खेळ, आर्य समाज यज्ञरथ, प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरी विद्यालय झांकी, लेझीम पथक, महात्मा गांधी कॉम्प्लेस सेटर १४ व १५ मधील महिलांचे सामूहिक नृत्य, १०१ मृदूंग वादक, ध्वज पथक - १ हजार महिला सामील, सजीव नंदी व महादेव वेशभुषा, कोळी महिला समुह वेशभूषा, झाशीची राणी वेशभूषा, छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा कुरुक्षेत्र श्री कृष्ण अर्जुन रथ.
 
दशावतार वेशभूषा इस्कॉन नगर कीर्तन आणि सावरकर स्मारक समिती देखावा सादर करण्यात आला होता, अशी माहिती विजय वाळुंज यांनी दिली. विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने तुर्भे गाव येथे गुढीपाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शांता महिला मंडळाच्या वतीने भजन सादर केले गेले. तसेच नवदुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तुर्भे स्टोअर परिसरामध्ये नववर्ष सद्भावना कलश यात्रा आयोजित करण्यात आली होती. अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी नेहमीप्रमाणे श्री गणेश मंदिर येथे गुढी उभारली गेली