आचारसंहिता असतानाही उरण नगरपालिकेतील भंगारची विक्री

10 Apr 2024 18:25:23
 uran
 
उरण | लोकसभा निवडणुक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु या आचारसंहिता काळात उरण नगरपालिकेमधील भंगार साहित्यांची विक्री करण्यात आली आहे.
 
आचारसंहिता काळात नगरपालिकेमधील मोठ्या प्रमाणात भंगार जमा झाले होते. त्या भंगार साहित्यांची विक्री आचारसंहिता काळात करण्यात आली.
 
त्यामुळे यामध्ये काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय कर्मचारी दबया आवाजात करीत आहे. संबंधित भंगार खरेदी करणारा आमच्याकडे लेखी ऑर्डर असल्याचे सांगतो, परंतु दाखवीत नाही. तरी याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Powered By Sangraha 9.0