मिरज-श्रीवर्धन एसटी बसला गोंडघरजवळ अपघात

By Raigad Times    10-Apr-2024
Total Views |
shreewardhan
 
बोर्लीपंचतन । मिरज-श्रीवर्धन एस.टी. बसचा गोंडघर गावाजवळ अपघात झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. एसटमध्ये यावेळी 34 प्रवासी होते. सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.श्रीवर्धन आगाराची एसटी मिरजहून श्रीवर्धनकडे येत असताना गोंडघर गावानजीक गाडीचा पाटा तुटला.
 
यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्ता सोडून खाली उलटली. गाडीमध्ये महिलांची संख्या जास्त होती. अपघाताची बातमी समजताच आसपासच्या ग्रामस्थांनी आणि दिघी सागरी पोलीसांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याबरोबरच अपघातग्रस्त प्रवाशांना उपचारासाठी योग्य ती मदत केली.
 
गाडीच्या चालकासहीत किरकोळ जखमी झालेल्या 16 प्रवाशांवर बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. काही जखमींना पुढील उपचारासाठी श्रीवर्धन ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आले.दरम्यान, गेल्या वर्षभरात श्रीवर्धन आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्या रस्त्यामधे बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे नवीन गाड्या मिळाव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत.