तळोजा येथे वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

10 Apr 2024 18:03:40
panvel
 
पनवेल | पलावा येथील कंपनीतून नावडे येथे घरी परतणार्‍या तरुणाच्या स्कूटीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तळोजा पोलिसांनी या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात
गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
 
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव शुभम म्हात्रे वय (२७) असे असून तो नावडे गावात कुटुंबासह राहत होता. तसेच, तो तळोजा मधील लोढाच्या पलावा येथील कंपनीत कामाला होता.
 
शुभम कामावरून सुटल्यानंतर स्कूटीवरून तळोजा एमआयडीसीतील असाई इंडिया ग्लास कंपनीसमोर आला असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने त्याच्या स्कूटीला धडक दिली. या अपघातात शुभम जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
 
Powered By Sangraha 9.0