ई रिक्षा ठेकेदाराकडून माथेरानकरांची लूट ; अडिच किलोमीटरसाठी आकारले जाते ३५ रुपये भाडे|

By Raigad Times    01-Apr-2024
Total Views |
 matheran
 
माथेरान | माथेरानमधील ई रिक्षा पायलट प्रोजेक्ट चालवणार्‍या ठेकेदाराकडून आकारण्यात येणारा तिकीट दर खुप जास्त असून, आरटीओनेच ई रिक्षाचे दर निश्चित करावे अशी मागणी स्थानिक नागरीक करीत आहेत.दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन दरम्यान प्रति माणसी ३५ रुपये दर आकारण्यात येत आहे.
 
सहा ते सात मिनिटांत हे अडीच किलोमीटर अंतर ई रिक्षाच्या प्रवासासाठी लागते. तर शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी फक्त पाच रुपये इतका माफक दर ठेवण्यात आला आहे.असे असले तरी अडिच किलोमिटरसाठी ३५ रुपये हा दर खुप जास्त आहे. काही दिवसांनी आणखी नवीन ई रिक्षांची सेवा उपलब्ध होणार आहे.
 
यासाठी आरटीओ ने या ई रिक्षाचे परवडणारे दर निश्चित केल्यास सर्वाना सोयीस्कर होऊ शकते अशी मागणी माथेरानकरांनी केली आहे.दरम्यान, श्रमिक हातरीक्षा चालकांच्या ताब्यात ई रिक्षा द्याव्यात असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीने पायलट प्रोजेक्टवर केवळ ठेकेदाराची नेमणुक केली आहे. यालादेखील माथेरानकरांनी वेळोवेळी विरोध केला आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.