मालाने भरलेला कंटेनर नाल्यात उलटला

29 Mar 2024 16:05:15
 Alibag
 
खोपोली । जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी (27 मार्च) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मालाने भरलेला एक कंटेनरला अपघात झाला. मुंबईहून पुणेकडे माल घेऊन जाणारा हा कंटेनर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या नाल्यात उलटला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
 
अनेक अवजड वाहने खालापूर बायपास मार्गे एक्सप्रेस वेवरून पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह अनेक ठिकाणी जाण्यासाठी या जुन्या मुंबई पुणे महामार्गाचा वापर करतात. पण या महामार्गांवर हॉटेल रिंकीपासून ते खालापूर फाट्यापर्यंत वळणांवर सूचना फलक, रिफ्लेकटर नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या सुमारास अंधारात रस्त्याचा अदाज येत नाही. त्यामुळे नेहमीच या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात.
 
महामार्गावर होणारे अपघात रोखण्यास मदतीसाठी हॉटेल रिंकीपासून ते खालापूर फाट्यापर्यंत वळणांवर सूचना फलक, रिफ्लेक्टर लावण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0