रोहित पवार आज मुरुडमध्ये, शेकापच्या निर्धार मेळाव्याला लावणार हजेरी

By Raigad Times    27-Mar-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग । राष्ट्रवादीचे युवा नेते (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आज (27 मार्च) मुरुड येथे येणार आहे. शेकापने याठिकाणी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजीत केला आहे. मुरुड तालुक्यात बुधवारी (दि.27) शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे.
 
मुरूड-जंजिरामधील हिंदू एज्युकेशन सोसायटी (हिंदू बोर्डिंग) विश्रामबागेच्या समोर हा मेळावा दुपारी साडे तीन वाजता होणार आहे. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.यावेळी शेकाप नेते तथा माजी आ. पंडित पाटील,अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील,शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, मुरुडचे शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.