दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

27 Mar 2024 13:30:37
 panvel
 
नवीन पनवेल । दुचाकीस्वाराने धडक दिल्याने चंद्रकांत हनुमंतराव पटटन याचा मृत्यू झाला आहे. 25 मार्च रोजी टी पॉईंट ते कळंबोली सर्कलकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत असलेल्या करंजाडे सनसेट पॉईंट ब्रिजजवळ काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवले आणि चंद्रकांत हनुमंतराव पटनन हा पायी चालत जात असताना त्याला पाठीमागून ठोकर मारली.
 
यात चंद्रकांत याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या व त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर वाहन चालक पळून गेला आहे. याप्रकरणी पनवेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0