आमदार होण्याची घाई असेल तर रिंगणात उतरा;घारेंना शिवसेनेचा इशारा

कर्जतमध्ये महायुतीमध्ये खटका

By Raigad Times    27-Mar-2024
Total Views |
karjat
 
कर्जत । राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांना आमदार होण्याची घाई झाली असेल तर एकदा होऊनच जाऊ दे...जनता आणि शिवसैनिक दाखवून देईल, असा इशारा शिवसेना (शिंंदे गट) जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी दिला. राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर आरोप करण्यात आले होते.
 
त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी, फेब्रुवारी महिन्यात अलिबाग येथील महायुती मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत विधानसभा मतदारसंघामधील एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात कर्जतमध्ये प्रतिस्पर्धी निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
 
या ठिकाणी मोठा विकास होत असताना तुमचा जळफळाट होत आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. तुम्ही जाहीरपणे आमदारांवर टीका करता आणि आमच्याकडून तुम्ही युती धर्माची आठवण करून देता हे चुकीचे असल्याचे भोईर यांनी म्हटले आहे. तुम्ही आता भावी म्हणून म्हणता, तुम्ही भावीच राहणार असून विद्यमान आमदार हे 25 वर्षे हलणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
सुरेशलाड यांच्यावर विद्यमान आमदार यांच्याकडून टीका झाल्यावर तुम्ही का शांत राहिले आहात? मात्र सुनील तटकरे यांच्यावर टिका झाल्यावर तुम्ही शाबासकी मिळविण्यासाठी अगदी दुसर्‍या दिवशी बाहेर पडलात. हे जनतेला काळत नाही असे वाटते काय? असा प्रश्न भोईर यांनी उपस्थित केला.
 
सुधाकर घारे तुम्हाला आमदार होण्याची घाई झाली असेल तर कोण कोणाला हत्तीच्या पायाखाली चिरडणार हे जनता दाखवून देईल, असा इशारा जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी दिला. आमदार महेंद्र थोरवे यांचे पूर्ण भाषण न ऐकता केवळ एक शब्द घेवून पत्रकार परिषदेत आमदारांवर टीका केली. मात्र आम्ही त्यांचा निषेध तालुकाप्रमुख म्हणून करतो.
 
जिल्हा कार्यकारिणीमध्ये दक्षिण रायगडमधील पदाधिकारी यांनी केलेल्या भाषणाला ते प्रत्युत्तर होते. तेथे आमदारांनी महायुतीच्या उमेदवार यांचे प्रामाणिक कामदेखील करण्याचे आश्वासन दिले होते, त्याबद्दल एनसीपीकडून अवाक्षर केले गेले.खोपोली येथील सुरेखा खेडकर यांच्या पक्ष प्रवेशात आमच्यावर वैयक्तिक टिका करण्याची गरज नाही.
 
मी तालुका प्रमुख असलो तरी 30 वर्षे वेगवेगळ्या पक्षाच्या आमदार यांच्या हाताखाली काम केले, त्यावेळी मी कधीही टोल दिला नाही. करोडोंचा निधी आणून आम्ही आमदार होऊन त्या माध्यमातून विकास साधलेला आहे आणि हे म्हणतात कोणता विकास केला.
 
दुसरीकडे महायुतीचा मेळावा अलिबाग येथे झाला, त्यावेळी त्यांच्या पक्षाचे नेते प्रमुख म्हणून उपस्थित होते,परंतु कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी तेथे आला नाही.त्यामुळे आम्ही काही दुतखुळे नाहीत आणि त्यांना 2024 ची घाइ झाली असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत.
 
या पत्रकार परिषदेत शिवराम बदे,संतोष भोईर यांनी आपली भूमिका मांडली.यावेळी शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, जिल्हा सल्लागार संतोष भोईर, विधानसभा संघटक शिवराम बदे, खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, महिला आघाडी जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे,युवा सेना तालुका प्रमुख अमर मिसाळ, रत्नाकर कोळंबे,सुनील रसाळ, दिलीप ताम्हाणे, रमेश मते, अंकुश शेळके, मिलिंद विरले, आदी मान्यवर उपस्थित होते.