शिंदे शिवसेनेकडून दुय्यम वागणूक ; सुरेखा खेडकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By Raigad Times    23-Mar-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत | कर्जत विधानसभा मतदारसंघात आम्ही आपले आयुष्य शिवसैनिक म्हणुन कार्य केले.मात्र मागील चार पाच वर्षे या मतदारसंघात महिला शिवसैनिक यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण आपल्या सहकार्‍यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहिर प्रवेश करीत आहे असे सुरेखा खेडेकर यांची स्पष्ट केले.
 
शिवसेना कर्जत विधानसभा मतदारसंघ मधील संघटक या पदावर कार्यरत असलेल्या सुरेखा खेडेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथे आयोजित पक्ष प्रवेश जाहीर कार्यक्रमात पक्षाचे नेते सुधाकर घारे यांचे उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
 
त्यावेळी प्रवेश प्रतिनिधी भगवान भोईर, तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष भगवान चंचे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या पक्ष प्रवेश नंतर सुरेखा खेडेकर यांनी यावेळी बोलताना शिवसेना शिंदे गटात महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक, जातीपातीच राजकारण आणि स्थानिक नेत्यांकडून होणारी कुचंबणा पाहून मनाला दुःख वाटायचे.
 
महिलांच्या कार्यक्रमांत सुद्धा पुरुष सूत्रसंचालन करायचे.राष्ट्रवादीत जेवढा सन्मान महिलांना मिळतो तो इतर पक्षात मिळत नाही असे जाहीर केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी यावेळी बोलताना खोपोली शहरात डबल इंजिन जोडलं गेले आहे. वैशाली जाधव यांना आता सुरेखा खेडेकर यांची साथ लाभणार आहे.
 
आपल्या पक्षाच्या वैशाली जाधव यांनी सुद्धा खोपोली मध्ये चांगल्या प्रकारे पक्ष बांधणीचे कामाची सुरुवात केली आहे. आपल्या पक्षात काम करताना कोणताही भाच्याचा टोल, भावाचा टोल, मेव्हण्याच्या टोल दिला जाणार नाही अशी ग्वाही सुधाकर घारे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.