राहुल पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला

23 Mar 2024 12:50:44
 Panvel
 
नवीन पनवेल | पनवेल शहर पोलिसांनी अटक केलेला राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर २२ मार्च रोजी सुनावणी झाली. पनवेल न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राहुल पाटीलचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
 
१२ मार्च रोजी ओवळे येथे आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये अश्लील हावभाव, दगडफेक आणि गोळीबार केल्याप्रकरणी राहुल पाटील सह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
त्यानंतर राहुल पाटील आणि इतर तिघांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात केली. त्यानंतर राहुल पाटील यांचे वकील वसीम शेख यांनी जामीन अर्ज दाखल केला. त्यानुसार २२ मार्च रोजी त्यांच्या जामीनवर पनवेल येथील न्यायालयात सुनावणी झाली. पनवेल न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे राहुल पाटीलला काही दिवस तरी आधारवाडी कारागृहात राहावे लागणार आहे
 
 
Powered By Sangraha 9.0