पनवेल शहर पोलिसांचे ‘मिशन ऑल आऊट’

23 Mar 2024 18:34:57
 Mumbai
 
पनवेल | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पोर्शवभूमीवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये ‘मिशन ऑल आऊट’ राबविले. यामुळे अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. मिशन ऑल आऊट मोहिमेमध्ये आझाद नगर झोपडपट्टी येथून राजू दास या याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून जवळपास १ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
 
याची किंमत १५ लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाचे सेवन करणार्‍या ८ जणांवरही कारवाई करण्यात आली. करंजाडे येथून आर्यन सैनी याला भारतीय हत्यार कायदा ४(२५) प्रमाणे ताब्यात घेऊन त्याच्याकडून १२ इंचाचा सरा हस्तगत केला आहे. तसेच देशी विदेशी दारूचा मुद्देमाल ७ इसमांकडून हस्तगत केला आहे. त्याची किंमत जवळपास २३ हजार ३८० रुपये इतकी आहे.
 
कॉप्टाअंतर्गत अंतर्गत ८६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. फैजान इम्रान अन्सारी (वय २७ रा.कच्ची मोहल्ला) हा मिळून आल्याने त्याच्यावर म.पो.का.की १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. हिस्ट्रीचिटर यांची तपासणी करण्यात आली.नियमांचे उलंघन करून गाड्या चालवणार्‍या २७ जणांवर कारवाई करून त्याच्या कडून ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वासून करण्यात आला आहे.
 
तसेच दोन महिलांविरुद्ध अश्लील हावभाव केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उघड्यावर अन्नपदार्थाची विक्री करणार्‍या ९ आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत
Powered By Sangraha 9.0