करा साजरी होळी....दान करा पुरणपोळी! संकल्प शैक्षणिक सामाजिक संस्थेचे आवाहन!

By Raigad Times    23-Mar-2024
Total Views |
 Panvel
पनवेल | आपल्याकडे होळीला पुरणाच्या पोळ्या करण्याची परंपरा आहे.घरात गोड धोड केलं जातं. ’होळीत दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा’... अशी त्यामागची कल्पना असते.
 
याच भावनेनं होळीत पुरणपोळी अर्पण केली जाते. हे अन्न जळून खाक होण्याऐवजी ते गरीब आणि अर्धपोटी झोपणार्‍यांच्या मुखात जावे या उद्देशाने संकल्प शैक्षणिक सामाजिक संस्था गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. यंदाही होळीनिमित्त पुरणपोळी दान करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी सांगितले.
 
Panvel
 
दृष्ट प्रवृत्ती,वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या होळीच्या सणामागील उद्देश आहे, होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. पनवेल परिसरामध्ये हा हिलकोत्सव ठीक ठिकाणी साजरा केला जातो. हा परिसर कोकणात येत असल्याने याला
 
Panvel
 
कुंडेवहाळची पुरणपोळी दान परंपरा!
कुंडे वहाळ गावातील देवदूत ग्रुपच्या माध्यमातून संकल्प संस्थेच्या सहकार्याने होळीच्या सणानिमित्त पुरणपोळी त्याचबरोबर इतर पदार्थ प्रत्येक घरातून दान करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. या पोळ्या गोरगरीब आणि झोपडपट्टी परिसरात राहणार्‍या रहिवाशांना वाटप केल्या जातात. त्यांनाही गोडधोड देऊन सामाजिक बांधिलकी जपली जाते.