माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुले यांची पत्नी नर्गिस यांचे निधन

22 Mar 2024 12:28:17
 Mumbai
 
मुंबई | महाराष्ट्र राज्याचे माजी आठवे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्य मंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचं वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावर त्या वास्तव्याला होत्या तिथेच त्यांची आज रात्री ११ वाजता प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर आंबेत या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
अंतुले यांच्या मुख्यमंत्री काळात नर्गिस अंतुले यांनी त्यांना भक्कम साथ देत राजकीय कारकीर्द आणि अल्पसंख्यांक समाजाला एकवटण्याचं काम केले. गोरगरीब जनता सामान्य नागरिक यांना त्या काळात पेन्शन मिळवून देण्याकरिता नर्गिस अंतुले यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. त्यांच्यावर अंत्यसंस्कार आंबेत येथील मूळ गावी दुपारी २ वाजता करण्यात आले.
 
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील, भाजपचे आमदार रविशेठ पाटील, कॉंग्रेसचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, श्रीनिवास बेडखले, अस्लम राऊत बबन मनवे, समीर बनकर, नाझीम हसवारे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0