शिवसेनेचे प्रमोद भायदे यांची चित्रलेखा पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट

22 Mar 2024 18:52:46
 alibag
 
अलिबाग | मुरुड नगर परिषदेचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची धुरा समर्थपणे सांभाळणारे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रमोद भायदे यांची शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मुरुड येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेवून पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेकापचे मुरुड तालुक्यातील जेष्ठ नेते तुकाराम पाटील, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे अध्यक्ष, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय गिदी, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, शेकापचे अमोल पाटील, राहील कडू, फुगावकर, अमोल मिठागरी तसेच शेकाप व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0