मुरुड परिसरात एलईडीने मासेमारी करणार्‍या १० बोटींवर कारवाई

21 Mar 2024 18:15:04
 murud
 
मुरुड | मुरुड परिसरात एलईडी मासेमारी करणार्‍यांना मुरुड तटरक्षक दल, कस्टम व पोलीसांनी अटक केली आहे. या कारवाईत दहा बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. एकदरा येतील कस्तुरी बोटीतील नाखवा व खलाशांना अलिबाग नागाव आक्षी साखर येथील एलईडी मासेमारी करणार्‍या याच बोटीतील परप्रांतीय मच्छीमारांनी मारहाण केली होती.
 
एलईडी मासेमारी मुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पद्धतीच्या मासेमारीमुळे समुद्रातील मासे मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. एलईडी मासेमारीला शासनाची बंदी असताना देखील शासनाला झुगारून हे मच्छीमार राजरोसपणे मोठ्या प्रमाणात एलईडी मासेमारी करीत असतात.
 
या संदर्भात अनेक वेळा स्थानिक कोळी बांधवांनी आवाज उठवला आहे. अनेक वेळा शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे की एलईडी मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी देखील शासनाच्या काही अधिकारांच्या जोरावर हे बोट मालक बेकायदेशीर रित्या एलईडी मासेमारी करीत आहेत.
 
मुरुड एकदरा येथील कस्तुरी बोटीचे नाखवा ध्रुवा लोदी व खलाशी सुरेश आगरकर व बारा सहकारी हे मुरुडच्या खोल समुद्रात मासेमारी करीत असताना अक्षी साखर येथील बोटी एलईडी मासेमारी करीत असल्याचे निदर्शनात आले. त्यावेळी या एलईडी मासेमारी लोकांना रोखण्यासाठी हे एकदरा येथील मच्छीमार गेले असताना अक्षी साखर येथील बोटीवर असलेल्या परप्रांतीय मच्छीमारांनी हल्ला केला होता...
 
ही वार्ता संपूर्ण मुरुड तालुक्यात वार्‍यासारखी पसरली व मुरुड तालुक्यातील पाच सोसायटीच्या मच्छीमारांनी जन आंदोलन छेडले होते. व या मारण करणार्‍या बोट मालकांवर व त्यावरील खलाशी, नाखवा यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
 
अखेरीस या मुरुड मच्छीमारांच्या आंदोलनाला सुमारे दीड महिन्यानंतर यश आला आहे. तटरक्षक दल कस्टम व मुरुड पोलीस यांनी एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्‍या आक्षी साखर येथे दहा बोटींना पकडून त्यावर असलेल्या नाखवा खलाशी व कर्मचारी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर बोटी पकडल्यानंतर मुरुड एकदरा येथील जगन वाघरे, प्रकाश सरपाटील, ध्रुवा लोदी व अनेक मच्छीमार उपस्थित झाले.
 
एलईडी मासेमारी मुळे मोठ्या प्रमाणात अशा एलईडी मासेमारी करणार्‍या लोकांवर कठोरा कठोर कारवाई करून अशा बोटींना नष्ट करावे अशी मागणी मुरुड तालुक्यातील तमाम मच्छीमारांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0