बाप निघाला साप, सावत्र लेकीला डसला ! १४ वर्षाची मुलगी आठ महिन्यांची गरोदर;कर्जत येेथील धक्कादायक घटना

By Raigad Times    18-Mar-2024
Total Views |
karjat .
 
कर्जत | बाप म्हणजे मुलांसाठी आधारस्तंभ असतो...मात्र कर्जत तालुक्यातील शेलू गावातील हा इसम बाप नाही साप निघाला. त्याने स्वतःच्याच सावत्र अल्पवयीन मुलीचा लचका तोडला..तोडत राहीला..धमकावत राहीला...ती मुलगी गरोदर राहीली आणि तो साप उघडा पडला. यानंतर नेरळ पोलिसांनी त्यांला बेड्या ठोकल्या आहेत.
 
सलमान अस्लम शेख याने हिंदू महिलेसोबत लग्न केले आहे. सदर महिलेचे ते दुसरे लग्न असून १४ वर्षाच्या मुलीला घेवून ती सलमान शेख सोबत शेलू गावातील जे के नगर या वसाहतीत राहते. अल्पवयीन असलेल्या मुलीवर सलमान शेख याने सप्टेंबर २०२२ मध्ये धमकावून अनैतिक संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली.
 
पत्नी घरात नसताना सलमान अस्लम शेख तिच्यावर बळजबरीने अत्याचार करायचा. त्यामुळे ती मुलगी गरोदर राहीली. याची माहिती समजताच तिच्या आईने नेरळ पोलीस ठाणे गाठले आणि नवर्‍याविरोधात तक्रार दिली आहे.सदर मुलगी नववीमध्ये शिक्षण घेत आहे.
 
हा प्रकार समजल्यावर नेरळ पोलिसांच्या पथकाने त्या १४ वर्षीय मुलीची सोनोग्राफी केली असता हे सत्य बाहेर आले आहे. नेरळ पोलिसांनी पोलीस उप अधीक्षक डी डी टेले यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सलमान अस्लम शेख यास अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
 
याप्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून भादवी कलम ३७६ (२) एन एफ,३७६ (३) ५०६ आणि बालकांचे लैंगिक अपराध पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२ नुसार सलमान अस्लम शेख यास अटक केले आहे.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांचे सह पोलीस उप निरीक्षक समीर लोंढे अधिक तपास करीत आहेत.