अडीच वर्षीय बालिकेवर शेजार्‍याकडून लैंगिक अत्याचार

18 Mar 2024 13:53:10
 Uran
उरण | तालुक्यातील चिरले गावातील ३५ वर्षीय नराधमाने एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला उरण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उरणमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
 
घटनेनंतर मुलगी गप्प एका कोपर्‍यात रहात होती. आईने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने घाबरून काहीच सांगितले नाही. मुलीच्या आईने वेळीच दखल घेत डॉक्टरकडे तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले.
 
गुरुवारी १४ मार्च रोजी चिरले येथे राहात्या घरी, शेजारी राहणार्‍या नराधमाने बलात्कार केला असल्याचे समोर आले आहे. पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलम आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो कायदा) अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि त्याला अटक केली आहे.
Powered By Sangraha 9.0