पनवेलमध्ये तीन कुपोषित बालके, ४१ मध्यम कुपोषित

By Raigad Times    16-Mar-2024
Total Views |
 Panvel
नवीन पनवेल | पनवेल तालुक्यात ३ कुपोषित बालके आढळले असून ४१ मध्यम कुपोषित बालके आहेत. या कुटुंबातील गरोदर महिलांना पोषक आहार मिळत नसल्यामुळे जन्माला येणारे बाळ कमी वजनाचे असते. मूल जन्मल्यानंतरही आईचे पुरेसे दूध तसेच पोषक आहार न मिळाल्याने त्याचे कुपोषण होते. आर्थिक चणचणीमुळे आईवडिलांचे त्याकडे दुर्लक्ष होते. यातून कुपोषणाचे प्रमाण वाढत जाते.
 
कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा स्तरावर अमृत आहार योजना, पूरक पोषण आहार योजना अशा अनेक योजना राबवण्यात येतात. त्या माध्यमातून गरोदर, स्तनदा माता तसेच बालकांना पोषक आहार पुरवण्यात येतो. तीव्र कुपोषित बालकांना आरोग्य विभागाकडून तीन प्रकारची औषधे देण्यात येतात.
 
अशा बालकांसाठी व्हिसीडीसी राबवली जाते. त्याना तीन महिने आहार दिला जातो. तीव्र कुपोषित असणार्‍या ३ बालकांना औषध देखील सुरू करण्यात आलेली आहेत. २१ दिवसानंतर पुन्हा त्यांची तपासणी होईल. असे पंचायत समिती पनवेल आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
 
तालुक्यात ४१ मध्यम कुपोषित बालके सापडले असल्याचे समोर आले आहे. मध्यम कुपोषित बालकांच्या आई वडिलांना आरोग्य शिक्षण दिले जाते. जेणेकरून तो तीव्र कुपोषित होऊ नये. उंची आणि वजनानुसार बालक कुपोषित आहे की नाही ते ठरवलं जातं असल्याची माहिती पंचायत समिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. वीटभट्टीवर काम करणारे मजूरांच्या कुटुंबातील गरोदर महिलांना पोषक आहार मिळत नसल्यामुळे जन्माला येणारे बाळ कमी वजनाचे असते.
 
मूल जन्मल्यानंतरही आईचे पुरेसे दूध तसेच पोषक आहार न मिळाल्याने त्याचे कुपोषण होते. आर्थिक चणचणीमुळे आईवडिलांचे त्याकडे दुर्लक्ष होते. यातून कुपोषणाचे प्रमाण वाढत जाते.