इंडिया आघाडीची रायगडातील पहिली सभा!

By Raigad Times    16-Mar-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापुर्वी रायगड जिल्ह्यातील इंडिया आघाडीची पहिली सभा अलिबाग येथे पार पडली. रायगडचे उमेदवार अनंत गीते आणि मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांना निवडूण आणण्याचा संकल्प यावेळी शेकाप नेते आ. जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, राष्ट्रवादीचे नेते अनिल तटकरे, कॉंगे्रसचे ऍड. प्रविण ठाकूर यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला. यावळी खासदार सुनिल तटकरे, शिदेगटाचे आमदार आणि भाजप यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली.