अलिबाग | विद्यानगर येथील एकाला पावणेतीन लाखांचा गंडा

16 Mar 2024 16:14:03
 alibag 
 
अलिबाग | लॉग इन अकाऊंट बनविण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून अलिबाग विद्यानगर येथील एकाला अज्ञात भामट्यांनी पावणेतीन लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ जानेवारी ते २७ जानेवारी यादरम्यान ही घटना घडली आहे.
 
अलिबाग विद्यानगर येथील ज्वेल्स ऑफ अलिबाग येथे राहणार्‍या फिर्यादी यांना दोन अज्ञात भामट्यांनी गंडा घातला आहे. त्यांना लिंकवर लॉग ईन अकाऊंट बनविण्यास सांगून त्याद्वारे विविध टिंडीग टास्क करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर लॉग ईन अकाऊंटवर जमलेले ५ लाख २८ हजार ८२९ रुपये परत मिळण्याकरिता त्या भामट्यांनी फिर्यादी यांच्या टेलिग्राम ऍपवर वेगवेगळ्या लिंक पाठविल्या आणि त्यांच्याकडून २ लाख ६४ हजार ५१७ रुपये उकळले.
 
त्यानंतर एकही रुपया फिर्यादीला परत न करता त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी दोन अज्ञात भामट्यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीस माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (२००८ चे सुधारणेसह) ६६ (उ), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत
Powered By Sangraha 9.0