बोरघाटात चालत्या कारने घेतला पेट

16 Mar 2024 18:16:14
 khopoli
 
खोपोली | मुंबई - पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात मुंबईकडून पुण्याकडे जाणार्‍या स्कोडा कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (१५ मार्च) सायंकाळी घडली. या आगीत ही कार जळून खाक झाली आहे.सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास मुंबई - पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या स्कोडा कारने अचानक पेट घेतला.
 
ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेड टीम, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी टीम, पोलीस यंत्रणा, देवदूत टीम अशा अनेक टीमने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. या घटनेमुळे याठिकाणची वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. तसेच वाहनचालकाने सावधानता बाळगत बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0