विन्हेरेच्या अशोक शिवदे परिवाराला आ.भरत गोगावले यांच्या हस्ते 4 लाखाची मदत

16 Mar 2024 14:27:41
mahad
 
महाड । महाड तालुक्यातील विन्हेरे येथील अशोक शिवदे हे पुरामध्ये वाहून जाऊन दुर्दैवी अंत झाला होता. घरची परिस्थिती हलाखीची आहे.
 
त्यांच्या पत्नीला शासनाकडून मदत मिळावी म्हणून आमदार भरत गोगावले व माजी जिप सदस्य निलेश ताठरे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.
 
त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शासनाकडून मृत अशोक शिवदे यांचे कुटुंबाना मदत म्हणून 4 लाखाचा धनादेश देण्यात आला.
Powered By Sangraha 9.0