रोह्यातून विस्तारित चिपळूण मेमू रेल्वेच्या फेर्‍या अखेर रद्द!

By Raigad Times    14-Mar-2024
Total Views |
 roha
 
रोहा । दिवा ते रोहा या मार्गावर नियमितपणे धावणार्‍या मेमू लोकलच्या चिपळूणपर्यंतच्या 30 मार्च 2024 पर्यंतच्या सर्व विस्तारित फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून केवळ गर्दीच्या हंगामात दिवा- रोहा मेमू चिपळूणपर्यंत विस्तारित केली जात असल्याने रेल्वेला रोहावासीय प्रवाशांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता.
 
त्यामुळे रोहा रेल्वे प्रवाशी महासंघाने या विस्तारास विरोध केल्याने रेल्वेने सावध पवित्रा घेत विस्तारित केलेल्या या गाडीच्या फेर्‍या तातडीने रद्द केल्या आहेत.दिवा ते रोहा या मार्गावर आधीच सेवेत असलेली गाडी विस्तारित करण्यात आल्याने मागील काही दिवस ही गाडी विलंबाने धावत होती, चिपळूण येथून रोह्याला जाताना पुढे रोहा ते दिवा या नियमित फेर्‍यांना देखील विलंबाचा फटका सहन करावा लागत होता.
 
त्याचबरोबर रोहा, कोलाड, निडी, चणेरा, इंदापूर, पाली आदी भागातील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता.रोहा रेल्वे प्रवाशी महासंघाने या गाडीचा विस्तार रद्द करून चिपळूण प्रवाशांच्या मागणी नुसार स्वतंत्र दिवा - चिपळूण अशी नवीन गाडी सुरू करावी अशी मागणी केली होती, अन्यथा रोको करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे त्यामुळे चिपळूण मेमूच्या 15 ते 30 मार्च दरम्यानच्या सर्व फेर्‍या रद्द केल्या आहेत.
 
कोकणात होळीसाठी येणार्‍या प्रवाशांसाठी ही गाडी लाभदायक ठरत होती. विस्तारितकेलेली गाडी रद्द करण्यात आल्याने आता चिपळूणपर्यंत येणार्‍या प्रवाशांना पर्यायी गाडीची प्रतीक्षा लागली आहे. दिवा- रोहा गाडीचा चिपळूण पर्यंतचा विस्तार रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे म्हणत रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने या यशाबद्दल सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा केला आहे.
चिपळूण-दादर स्वतंत्र गाडीची सुरू करावी
रोहा-दिवा मेमू लोकल ट्रेनचा विस्तार करून या मार्गावरील नियमित प्रवाशांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा दादर ते चिपळूणपर्यंत स्वतंत्र गाडी चालवण्यात यावी, अशी मागणी प्रवासी जनतेकडून केली जात आहे. कोकण तसेच मध्य रेल्वेने याबाबत गांभीर्याने विचार करावा, यासाठी प्रवासी संघटनांनी रेल्वेकडे पाठपुरावा सुरू ठेवला आह