साडीबाबत तक्रार असेल तर फोन करा! अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिला सन्मानासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना

By Raigad Times    14-Mar-2024
Total Views |
 mumbai
 
मुंबई । अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांच्या सन्मानासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना सरकारने सुरु केली. या योजनेअंर्तगत वर्षाला एक साडी महिलांना देण्यात येतेे. मात्र काही महिलांना या साड्या निर्मितीदोष आणि फाटलेल्या मिळाल्याच्या तक्रारी आल्यामुळे, तक्रार निवारणासाठी राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने एक फोन नंबर जारी केला आहे.
 
कॅप्टिव्ह मार्केट योजनेबाबत अर्थसंकल्पीय बजेटमध्ये या विषयावरुन गदोराळ झाला होता. यावेळी, ताई साडीची कॉलीटी चेक करायला आधी तुमच्याकडे पाठवू, तुम्हाला आवडली तरच त्या राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींना वाटप करु असे अर्थमंत्री अजित पवार यांनी थेट सभागृहातच वर्षा गायकवाड यांना साडीच्या कॉलीटीची गॅरटी दिली होती.
 
प्रत्येक्षात जेव्हा साड्या वितरीत करण्यात आल्या तेव्हा फॉल्टी असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. राज्यामध्ये काही दुकानात खराब साड्या, फाटलेल्या साड्या मिळाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तथापि आतापर्यंत निदर्शनास आलेल्या खराब झालेल्या साड्या या अत्यल्प असल्याचे सरकाने सांगितले असले तरी, राज्याच्या वस्त्रोद्योग विभागने तक्रार क्रमांक वितरित केला आहे.
 
mumbai
 
काही तक्रारी असतील तर ळपषेाीलि.ेीस.ळप ई-मेलवर तक्रार करावी किंवा 022-27703612 नंबर वर (कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते सायं. 6.15) या वेळत संपर्क करावा, असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.कॅप्टिव्ह मार्केट योजनेमुळे राज्यातील 24 लाख 80 हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींना साड्यांचा लाभ मिळाला आहे.
 
त्याबरोबरच शेतकर्‍यांच्या कापसाला मागणी वाढून सूतगिरणींच्या सुताला भाव व स्थानिक यंत्रमागधारकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.11 मार्च 2024 पर्यंत महामंडळाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तालुका स्तरावरील गोडाऊनपर्यंत सर्व साड्यांचा 100 टक्के पुरवठा पूर्ण केला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून आज पर्यंत 13 लाख 17 हजार साड्यांचे वितरण पूर्ण झाले असून, शिल्लक साड्यांचे त्वरित वितरण करण्याच्या सूचना अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
 
तक्रारी असलेल्या ठिकाणी महामंडळाने आपले अधिकारी पाठवून त्वरित साडी बदलून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले अधिकारी पाठवून साडीचा दर्जा, पुरवठा व वितरणाबाबत तपासणी अहवाल मागवला आहे.