पनवेल महापालीकेच्या तिजोरीत 250 कोटीहून अधिक कर जमा

By Raigad Times    09-Feb-2024
Total Views |
 alibag
 
पनवेल । यावर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेच्या तिजोरीत 250 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेच्यावतीने विविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
नागरिकांचा या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याचाच सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.मागील वर्षाच्या तूलनेत यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत 250 कोटीहून अधिक रूपयांची भर पडली आहे. ज्या नागरिकांना अजूनही मालमत्ता कराची बिले मिळाली नाही त्यांनी महापालिकेच्या 1800 5320340 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधल्यास कॉल सेंटरच्या माध्यामातून बिल घेता येणार आहे.
 
तसेच मालमत्ता करासंदर्भातील हरकती असल्यास मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज संबधित प्रभाग कार्यालयाकडे सादर करावेत.
मालमत्ताधारकांना नावामध्ये बदल करायचा असल्यास महापालिकेच्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. तसेच www. panvelmc.org  या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.या सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा तसेच मालमत्ताकराबाबत काही शंका असल्यास त्यांनी 1800 5320340 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.